ना.धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते दि.६ रोजी स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व

26

🔹मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-बाजीराव भैय्या धर्माधिकारी

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी)

परळी(दि.2नोव्हेंबर):-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृहाचा लोकार्पण समारंभ व दिपावली स्नेहपर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील पुरातन मंदिरांपैकी एक असलेल्या अंबेवेस भागातील श्री. काळाराम मंदिर येथे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृह उभारणी झालेले आहे. त्याचबरोबर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा श्री. काळाराम मंदिर अंतर्गत जिर्णोद्धार, सजावट व सुशोभीकरण कार्य करण्यात आले आहे. दिपावलीच्या पावन पर्वात याठिकाणी करण्यात आलेल्या नेत्रदीपक कामांचे लोकार्पण राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते शनिवार दि.६नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. करण्यात येणार आहे.

दिपावलीच्या पावन पर्वावर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सामाजिक सभागृहाचा लोकार्पण समारंभ तसेच दिपावली स्नेहपर्व कार्यक्रम होणार आहे.दिपावली स्नेहभेट, शुभेच्छांचे आदानप्रदान व स्नेहीजनांचे एकत्रित स्नेहमिलन असे या समारंभाचे स्वरुप असणार आहे. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.