दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने “एक दिवा दिव्यांगांसाठी” या विशेष उपक्रमाचे आयोजन – राजेंद्र लाड

28

✒️आष्टी प्रतिनिधी)सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.2नोव्हेंबर):-दिव्यांगांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीड च्या वतीने “एक दिवा दिव्यांगांसाठी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या विशेष उपक्रमातून आर्थिक व वस्तूरुपातील केली जाणारी मदत थेट बीड जिल्ह्यातील गरीब,वंचित,निराधार दिव्यांग कुटुंब यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.

सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील निराधार,वंचित व गरीब दिव्यांग कुटुंबे या आनंदापासून दूर असतात.या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा,त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीड च्या वतीने या वंचित घटकांना कपडे,पणत्या,आकाश कंदील,दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे.यासाठी बीड जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सर्व जिल्हा शाखा पदाधिकारी तसेच सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी,संघटनेचे सर्व सदस्य आपआपल्या भागातील वंचित,निराधार व गरीब दिव्यांग बांधवांच्या कुटुंबाना स्वतःची आर्थिक मदत करणार आहेत.तसेच पणत्या,आकाश कंदील,दिवाळीचा फराळ,कपडे आदींची मदतही घरपोहोच करणार आहेत.

यावर्षी वंचित,निराधार व गरीब दिव्यांग बांधवांना मदत करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी बांधव मदत करणार आहेत.ही मदत बीड जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी बांधव स्वतःच्या आर्थिक मदतीने वंचित,निराधार व गरीब दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग विद्यार्थी,दिव्यांग जेष्ठ नागरीक,दिव्यांग माता – भगिनींनी आपआपल्या परीने ज्यांना जशी गरज आहे तशी तन,मन,धनाने मदत करणार आहेत.

समाजातील सर्व घटकांनी आपला मोलाचा हातभार लावून वंचित,निराधार व गरीब दिव्यांग बांधवांना आपल्या परीने आपल्या भागातील दिव्यांग बांधवांना मदत करावी व “एक दिवा दिव्यांगांसाठी” या विशेष उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी केले आहे.