नमामी गंगा प्रोजेक्ट अंतर्गत गंगाखेड गोदावरी घाटाचा होणार विकास

23

🔹आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व देशातील ख्यातनाम आर्किटेक टिना धर्मसे यांनी गोदावरी घाटाची केली पाहणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड-प्रतिनिधी)

गंगाखेड(दि. 2नोव्हेंबर):- मंगळवार, गंगाखेड येथील गोदावरी घाटाचे काम केंद्र सरकारच्या नमामि गंगे या योजनेअंतर्गत करण्याकरिता आज गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व देशातील ख्यातनाम आर्किटेक टिना धर्मसे यांनी गंगाखेड येथील गोदावरी घाटाच्या जागेची पाहणी केली. त्याचबरोबर प्रस्तावित घाटाचा नकाशा बनविण्यात आला असून त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या व आमदार साहेबांनी सुचविलेल्या कामांचा सामाविष्ट करून गोदावरी घाटाचा प्रस्ताविक कामाचा नकाशा लवकरच तयार होणार आहे.

गोदावरीच्या दोन्ही बाजूस अत्याधुनिक व आकर्षक घाट, दोन्ही बाजूस रस्ते, मोठी गार्डन, स्नान व स्वच्छालयगृहे यासह अनेक भौतिक सुविधांची निर्मिती झाल्यानंतर हे एक देशातील आकर्षक स्थळांपैकी एक होईल व त्यामुळे गंगाखेड शहराचे नाव देशभरात पोहोचेल. पर्यटन व तीर्थक्षेत्राला चालना मिळून, स्थानिक व्यवसायात वाढ होऊन यातून रोजगाराची निर्मिती होईल व येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल. सदरील ठिकाण पाहण्यासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे गंगाखेड येथील बाजारपेठ आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होईल. यावेळी आमदार गुट्टे यांनी आर्किटेक यांना अत्यावश्यक सूचना देऊन सर्व नकाशांची पाहणी केली.

सदरील प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरिता केंद्राकडे पाठवण्यात येईल व याबाबतीत मा. केंद्रीय मंत्री महोदयाडे याबाबत मी स्वतः वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम तत्काळ मार्गी लावणार असल्याचे आवर्जून सांगितले.यावेळी विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, अनिल यानपल्लेवार, वैजनाथ टोले, राजू खान, शहराध्यक्ष खालिद भाई, इंतेझार सिद्दिकी, छोटू कांबळे यांच्यासह सर्वसामान्य नागरिक रासप व गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.