अवैध वाळू तस्करी मध्ये 50 लाखांचा मुद्देमाल जप्त; तहसीलदार सचिन खाडे यांची कारवाई

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2नोव्हेंबर):-तालुक्यातील माळस पिंपळगाव येथे आज मंगळवारी दुपारी गोदापात्रातून अवैध वाळू ट्रॅक्टर घेऊन जात असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाल्यानंतर पथकासह त्याठिकाणी दाखल होऊन पाच ट्रॅक्टर व केन्या जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली आहे. या कारवाईमध्ये 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.

या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले असून या पकडलेल्या ट्रॅक्टर वर नेमकी काय कारवाई केली जाईल व किती दंड दिला जाईल ही चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. या आठवड्यामध्ये तहसीलदारांची ही तिसरी कारवाई आहे.यापूर्वी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी पाच हायवा पकडले होते त्यातील चार हायवावर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत एक हायवा वर कुठलीच कारवाई नाही. कुठल्या कारणामुळे एक हायवा कारवाई पासून वंचित आहे हे नेमके कळायला तयार नाही.