पाटोदा तालुक्यातील महासांगवीत ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

30

🔸ह.भ.प.राधाताई सानप महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

पाटोदा(दि.2नोव्हेंबर):- तालुक्यातील महासांगवी येथील श्री क्षेत्र मिराबाई आईसाहेब संस्थान व श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महंत ह.भ.प.राधाताई सानप महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि.१ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक स्तुत्य उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील श्री क्षेत्र मिराबाई आई साहेब संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमाचे आयोजन नियमित करण्यात येते.

या अनुषंगानेच कोरोनाच्या संकटमई परिस्थितीमध्ये राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.तरी या कोरोना महामारीच्या संकट काळात रुग्णांना व तरुणांना रक्त कमी पडू नये या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन ह.भ.प.राधाताई सानप महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.
शिबीरामध्ये समाजबांधवानी व महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता.या शिबिरात ४५ रक्तदात्यानी रक्तदान केले.

यावेळी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,तहसिलदार सुनिल ढाकणे,भाजपा भटके विमुक्त युवती प्रदेश अध्यक्षा अँड.भाग्यश्री ढाकणे,पोलिस निरीक्षक पठाण,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर,ह.भ.प.सांगळे महाराज,आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,पत्रकार महेश बेंदरे,सामाजिक कार्यकर्ते भैरवनाथ भोसले,श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे लखन विर,अनिकेत जावळे,दत्ता वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
———————————————-
ह.भ.प.सानप यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटुंबांला साडी चोळी कपडे व दिवाळीचा किराणा वाटप

पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील महंत ह.भ.प.राधाताई सानप महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भैरवनाथ भोसले यांनी महासांगवी येथील एका गरीब कुटुंबाला साडी,चोळी,कपडे व दिवाळी सणाला किराणा सामान देऊन सामाजिक बांधिलकी जपून वाढदिवस साजरा केला.