राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन दानापूर येथे १२ डिसेंबरला

28

✒️दानापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

दानापूर(दि.2नोव्हेंबर):-मराठी बोली साहित्य संघ नागपूर चे आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन येत्या दि. १२ डिसेंबर २०२१ (रविवारी )रोजी दानापूर ता. तेल्हारा जि. अकोला येथे घेण्याचे निश्चित झालेले आहे. दानापूर या जन्मगावी हे संमेलन व्हावे , अशी इच्छा इचलकरंजी येथील संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष डाॕ. प्रतिमाताई इंगोले यांनी जाहिरपणे व्यक्त केलेली होती. त्यांंनी दिलेल्या निमंत्रणानुसारच मराठी बोली साहित्य संघाचे वतीने संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर ,कार्यकारिणी सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर तसेच डाॕ. संजय निंबेकर यांनी दानापूर येथे भेट दिली.

समिती सदस्यगणांचे डाॕ. प्रतिमाताईंनी दुपट्टा देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या सभेत गावातील स्थानिक आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. संमेलनाची तारीख ,स्थळ निरीक्षण ,निवास व्यवस्था आदी बाबत सविस्तर चर्चा होऊन सदर संमेलन दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत करण्याचे निश्चित झाले.तसेच दि. ११ डिसेंबर च्या सांयकाळी ७ ते १० पर्यंत गावक-यांच्या आग्रहास्तव लोककला(दंडार, गंमत,डहाकाआदी) सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे.

दानापूर या गावी जाण्यासाठी अमरावती पर्यंत रेल्वेने जावे लागते तेथून अमरावती – आकोट हिवरखेड मार्गे किंवा शेगाववरूनही संमेलन स्थळी जाता येते . सदर संमेलन स्व. बापुसाहेब ढाकरे कला अकादमी आणि कै.शामरावबापू सार्वजनिक वाचनालय दानापूर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामवासिय जनतेच्या सहयोगाने होत आहे.संमेलनाचे आयोजन हे छोटेखानी असून कोरोना नियमांचे अधिन राहुन करण्यात येणार आहे.राज्यातील बोली अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहे , हे विशेष.