ग्रामपंचायत राहपली (खुर्द) येथे ग्रामसेवकाचा मनमानी कारभार

27

🔹ग्रा. प. मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे त. मु. अध्यक्ष किशोर चांदुरे यांचा आरोप

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.2नोव्हेंबर):-15 वित्त आयोग मधून आलेल्या निधीचा पेसा अंतर्गत आलेल्या निधीचा सरकार कडून आलेल्या निधीमध्ये व इतर निधीत खुप मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला शासनाकडून गावाच्या विकासासाठी मिळणाऱ्या कोणत्याच योजनेची माहिती होऊ देत नाही.गावातील पाणीपुरवठा टाकी पडण्याच्या मार्गावर असून त्याच्या कडे दुर्लक्ष केले जात आहे .मागील 2 वर्षापासून नळ योजना बंद आहे असं शासनाला माहिती देऊन फुकट नळ पट्टी वसूल करत आहे.गावातील नागरिकांनी जाब विचारला असता माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहे. लोकांना कुठलीही माहिती देत नाही.या मध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

असं गावातील सुरक्षित नागरिकांचे म्हणणे आहे. लोकांना कोणत्याही शासकीय योजनेबद्दल माहिती देत नाही. यात जनकल्याण निधी, अपंग निधी समान्य फंड इतर योजनेची निधी बद्दल माहिती देत नाही.ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहतं नाही लोकांना घरकुल योजने बद्दल माहिती देत नाही.

या संशययाच्या भोवऱ्यात ग्रामपंचायत सापडली आहे ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असे गावातील नागरिकांना वाटत आहे.या ग्रामपंचायत च्या कामकाजाची चौकशी करून ग्रामपंचायत चा सर्व हिशोब ग्रामसेवाकानी द्यावा अशी गावातील नागरिकांनी व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किशोर चांदुरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मागणी केली आहे.