राहुल दादा लव्हे युवा मंचतर्फे आयोजित पुण्यातील विमाननगर येथील मेळाव्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.3ऑक्टोबर):-राहुल दादा लव्हे युवामंच च्या वतीने पुण्यातील विमान नगर येथे युवक मेळावा 2021चे आयोजन करण्यात आले होते. तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन राहुल दादा लव्हे यांच्यातर्फे करण्यात आले होते.

याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपाध्यक्ष भुजंग लव्हे, नगरसेवक बाबा नायडू, सादिक शेख, युवा नेते राहुल दादा लव्हे, सँडी म्हस्के , ॲड. गोपाल गुंते,विशाल खरात ,सचिन बोराडे, विनोद बनसोडे ,फिरोज शेख, सुरेश खंडागळे, अरुण मगर, सचिन चव्हाण,राहुल बेगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा नेते राहुल लव्हे हे युवकांसाठी कार्य करत असून अनेक सामाजिक, शैक्षणिक, नोकरीविषयक, मार्गदर्शन आत्तापर्यंत ते युवकांना करत आहेत. स्वयंरोजगारासाठी युवकांनी स्वतः आपल्या करिअरचा मार्ग निवडावा यासाठी या युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे फिजिकल डिस्टन्स सिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत निकम यांनी केले तर उपस्थितांचे आभार विशाल खरात यांनी मानले.

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED