महावितरणच्या विरोधात शेतकऱ्याच्या संतप्त भावना;सहाययक अभियंत्यांना दिला पंधरा दिवसाचा अलटीमेंटम

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.3नोव्हेंबर):-धुळदेव फिडरवरील शेती पंपाची विज गेले वर्षाभर सतत चार चार तास जात असल्याने शेतकरी हैराण झाला असुन सतत लाईट जाते, जंप उड़ने, विज वाहक तार तुटणे, डिंपी घोटाळा होणे असे प्रकार वारंवार होता असल्याने या फिडरवरील संतप्त शेतकऱ्यांनी विज मंडळाच्या म्हसवड,ता.माण,जि. सातारा येथील कार्यालयाच्या कारभारा विरुध्द संतप्त भावना व्यक्त करीत येथील सहाय्यक अभियंता तायडे यांना निवेदन देत पंधरा दिवसात विविध मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा अल्टिमेट धुळदेव फिडरवरील, मानेवाडी ,राऊतवाडी, ढोकमोडा, परिसरातील ४३ शेतकरी बांधवांनी सह्याचे निवेदन दिले.

संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की आम्ही धुळदेव ए जी फिडरवरील शेतकर्यांना रोज आठ तास विज पुरवठा झाला पाहिजे, ट्रान्सफार्मर , तार जळाली , जंप जळाला किंवा इतर घोटाळा झाला तर तातकाळ दुरुस्त करावा, विज घोट्याळ्यामुळे जेवढ्या वेळ लाईट जाईल तेवढ्या वेळात ज्यादा लाईट द्यावी, म्हसवड सब स्टेशनला शेनवडी (दिंघची) ३३ के व्ही लाईन चालू करावी, शेती पंपाला मिटर प्रमाणे बीले मिळतात परंतु ज्या शेतकर्यांना कनेक्शन दिली नसताना लाईट ढोबळ लाईट बीले दिली आहेत त्याची चौकशी होऊन कारवाई कराली अशा आठ मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न केल्यास म्हसवड विज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब वामन माने,बंडू माने, अजिनाथ पडळकर, पोपट काटे, गुलाब कलढोणे, अंकुश चव्हाण,तानाजी काटे,तानाजी माने, शिवाजी माने, नरेन्द्र पवार,आदी ४३ शेतकर्याच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

सहाय्यक अभियंता तायडे धुळदेव फिडरवरील काही भागात मेन विज वाहक तारेच्या खालून सब लाईनचे अंतर कमी असल्याने गेले अनेक दिवसापासुन घोटाळा होत होता गेल्या चार दिवसापासुन या दोन्ही लाईन मधील अंतर वाढवण्याचे काम सुरु असताना आमचा एक कर्मचारी यास शॅक लागून पोलवरुन खाली पडला होता तो मरणाच्या दारात होता त्यावर उपचार होते जरुरीचे होते त्यामुळे दोन दिवस मिरज येथे उपचारासाठी गेलो होतो त्यामुळे कामाला उशीर झाला असला तरी आज ते काम पुर्ण होणार आहे त्याप्रमाणे त्यांच्या इतर मागण्या हि पूर्ण करण्याचे अश्वासन*

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED