पत्रकाराला दमदाटी व शिवीगाळ; पत्रकार संघटनेच्यावतीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.3नोव्हेंबर):-दहिवडी येथील दैनिक पुढारीचे पत्रकार राजेश इनामदार यांना जुन्या बातमीच्या रागातुन मलवडीचे माजी सरपंच दादा जगदाळे यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी दहिवडी पोलिसात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले असुन या घटनेचा माण तालुक्याती विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध करत जगदाळे यांना तातकाळ अटक करावी अन्यथा दहिवडी पोलिस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघटने तर्फे देण्यात आला.

आज मंगळवार रोजी माण पंचायत समीतीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने दहिवडी विश्राम गृह येथे राजेश इनामदार आले आसताना मलवडी तालुका माण येथील माजी सरपंच दादा जगदाळे त्यांच्या जवळ गेले व त्यांना म्हणाले ये राजा माझ्या नावाने मी सरपंच असताना जुगाराच्या आड्ड्यावर दोनवेळा सापडल्यावर दोनदा बातम्या दिल्या काय वाकडे झाले रे माझे म्हणत शिवीगाळ करुन दमदाटी करत असताना इतर पत्रकार इनामदार यांच्या जवळ काय झाले हे पहाण्यासाठी येताच जगदाळे यांनी येथून पळ काढला तेथून सर्व पत्रकार दहिवडी पोलिस ठाण्यात गेले व दादा जगदाळे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले व तातकाळ अटक करण्याची मागणी धरत पोलिस ठाण्यात बसले होते.

या दरम्यान दहिवडी पोलिसानी माजी सरपंच दादा जगदाळे मानना शोधण्यासाठी पोलिस मलवडी या त्यांच्या गावी गेले असता ते फरारी होऊन मोबाइल सर्विस आॅफ केला आहे दहिवडी पोलिस दगदाळे यांचा शोध घेत असुन माजी सरपंच दादा जगदाळे यांनी सार्वजनिक ठिकाणी पत्रकारांला जुन्या बातमीचा राग मनात धरुन शिवीगाळ व दमदाटी करणार्या जगदाळे यांचे वर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने गुन्हा दाखले करुन अटक करण्याची मागणी करत या घटनेचा तिव्र शब्दात निषेध माण तालुक्यातील विविध पत्रकार संघटनानी केला आहे