धानाचे पुंजने आगीत खाक शेतकऱ्याचे मोठे नुकसान…

26

🔹अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी ठाणेदार श्री. रोशन यादव हजर..

🔸पोलीस विभागाचे विशेष कौतुक..

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.3नोव्हेंबर):-मौजा सोंद्री तह. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथील महादेव काशीराम दोनाडकर, नक्टू विस्तारी कमाने, दिनकर विस्तारी कमाने या शेतकऱ्याचे पिंपळगाव रोड लगत शेतामध्ये असलेले धानाचे पुंजने दिनांक 2 नोव्हेंबर ला रात्री 9.30 च्या सुमारास आग लागली . यामधे पूंजने पूर्णपणे पेटून खाक झाले असून एकूण एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पो. स्टे. चे ठाणेदार श्री. रोशन यादव स्वतः जातीने 10 वाजता हजर झाले आणि नगर परिषद ब्रम्हपुरी येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात येई पर्यंत ठाणेदार श्री. रोशन यादव रात्री 2 वाजे पर्यंत हजर होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास श्री. ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.