डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे रॅगिंग या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.3ऑक्टोबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे “आझादी का अमृत महोत्सव व विधी सेवा सप्ताहानिमित्त” महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती, महिला अध्ययन केंद्र, अँटी रॅगिंग सेल तथा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विधी सेवा समिती, ब्रम्हपुरी यांच्या सौजन्याने दि. 01 नोव्हें.2021 रोज सोमवारला सकाळी ठीक 11.00 वाजता झूम ॲपवर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मान. एम. जी. मोरे,अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकरी, प्रथम वर्ग, ब्रम्हपुरी यांनी विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्या अत्यंत ज्वलंत अशा रॅगिंग या विषयावर भाष्य करून त्यासंबंधी कायद्यात असलेल्या विविध प्रतिबंधात्मक तरतुदींवर प्रकाश टाकला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांची या वेबिनारला विशेष उपस्थिती लाभली होती. त्यांनी आपल्या संबोधनात या विषयावर वेबिनार घेण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विधी सेवा समिती, ब्रम्हपुरीचे आभार मानले आणि अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमासाठी महाविद्यालय यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करेल याची ग्वाही दिली.

या वेबिनार मध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

या वेबिनारचे संचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार महिला तक्रार निवारण समिती व महिला अध्ययन केंद्राच्या समन्वयक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी मानले.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED