भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून 7 नोव्हेंबर ला विद्यार्थी दिवस साजरा करणार !

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण)मो:-9075686100

🔸भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून 7 नोव्हेंबर ला विद्यार्थी दिवस साजरा करणार !

म्हसवड(दि.3नोव्हेंबर):-7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकातील असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता.त्यामुळे महाराष्ट्र भर “विद्यार्थी दिवस”साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधून विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक :- प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा)
या कार्यक्रमाची अध्यक्षता योगेश थोरात सर (प्रदेशाध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) हे करणार आहेत या कार्यक्रमाचे ठिकाण डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सर्वोदय हौसिंग सोसायटी रविवार पेठ सातारा येथे होणार आहे.

या कार्यक्रमाची तयारी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात चालू आहे कार्यक्रमाचे संयोजक .प्रथमेश ठोंबरे (राज्य प्रवक्ता भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) किशोर खरात (जिल्हा उपाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) .कुणाल देवकुळे (तालुका अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) रोहित नितनवरे (शहर अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) मंगेश लोखंडे,शुभम भंडारे,इरफान महात, संकेत यादव,इ. या कार्यक्रमासाठी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेतन आवडे (जिल्हा अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) यांनी केले आहे