वैद्यकीय(नीट) पूर्व परीक्षेत पूजा जालिंदर चाटे हिचे यश

30

🔹सातशे वीस गुणांपैकी मिळाले ५२६ गुण

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)

माजलगाव(दि.4नोव्हेंबर):- तालुक्यातील खाडेवाडी येथील पूजा जालिंदर चाटे या विद्यार्थ्यीनीने वैद्यकीय पूर्वपरीक्षेत यश मिळवत निट परिक्षेत सातशे वीस गुणांपैकी ५२६ गुण मिळवून एमबीबीएस साठी पाञ ठरली आहे. तिच्या मिळवलेल्या यशाबद्दल सर्वञ कौतूक होत आहे.दिंद्रुड पासुन जवळच असलेल्या खाडेवाडी ता माजलगाव येथील पूजा जालिंदर चाटे हिने यंदा वैद्यकीय पुर्व परीक्षेसाठी निटची परिक्षा दिली होती. सदर परिक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असुन, ७२० गुणांपैकी ५२६ गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. खाडेवाडी सारख्या ग्रामीण भागातील असुन,तिचे प्राथमिक शिक्षण खाडेवाडी येथील शाळेत झाले.

तर ५ वी ते १०वी शिक्षण दिंद्रुड येथील माध्यमिक विद्यालय दिंद्रुड झाले. इयत्ता दहावी ला 95 टक्के गुण घेत तिने लातूर येथील शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळवला. सुरूवाती पासुनच डाॅक्टर होण्याचे स्वप्न बाळगत त्यादृष्टीने त्याने तयारी चालु केली होती. दिवस रात्र अभ्यास करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे या ध्यासापोटी तिने हे यश मिळवल्याचे ती सांगते. यासाठी वडिल जालिंदर चाटे यांनी त्याला प्रोत्साहन दिले होते. तिने मिळवलेल्या यशाची बातमी ऐकुन त्याच्या आईवडिलांसह कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वञ होत आहे.