जोगशेलू या गावात वीरांगना झलकारी बाई संस्थेच्या माध्यमातून गोरगरीबांना मोफत किराणा वाटप

80

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.4नोव्हेंबर):- आज दि.3/11/2021रोजी शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू या प्राचीन जोगेश्वरी माता मंदिर असलेल्या दुर्गम गावी गोरगरीब गरजू आदीवासी बांधवाना दिवाळी निमित्ताने मोफत किराणा वाटप करण्यात आला.या मध्ये धुळे येथील नामवंत स्री रोग तज्ञ डाँ आराधना भामरे,डाँ चेतन पाटील,डाँ सुशील नवसारे, सौ लिना मुणोत,डाँ सुरजमल जाखोटे,मयुर सोनवणे, आशाताई रंधे या दानशुर दात्यांनी दिलेल्या दानातून हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. तेलपिशवी, रवा, मैदा, साखर, मुरमुरे,साबण, बिस्किट इ. वस्तु वाटण्यात आल्या.

झलकारी बाई संस्था ही कुठलेही अनुदान नसतांना सौ गीतांजली कोळी यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून दर दिवाळी शंभर गोरगरीब लोकांना मोफत किराणा वाटप हा स्त्युत्य उपक्रम राबवत असुन सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.डाँ.जितेंद्रदादा देसले यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत सौ गीतांजली कोळी यांच्या दारूबंदी च्या कार्याचे कौतुक करून महीला भगीनींना दारूबंदी च्या कार्याला साथ देण्याचे आवाहन केले….

यावेळी बोलतांना संस्थेच्या अध्यक्षा व आयोजक गीतांजली कोळी यांनी या उपक्रमासाठी मदत करणा-या सर्व दात्यांचे आभार मानत दरवर्षी हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल असे सांगून उपस्थित महीलांमध्ये जोगशेलू या गावात दारूबंदी करण्यासाठी मार्गदर्शन करून जनजागृति केली. यावेळी वाल्या सेना व दारूबंदी मोर्चा चे भुषण कुवँर, हेमराज बोरसे,श्रीकांत कोळी, भैया कोळी, संजय कोळी, राहुल कोळी, सचिन कोळी,आबा कोळी, किरण कोळी यांच्या सह गावातील गोरगरीब गरजू महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सौ.गीतांजली कोळी वीरांगना झलकारी बाई कोळी स्री शक्ति सामाजिक संस्था.धुळे
महाराष्ट्र दारूबंदी महीला/मोर्चा
वाल्या सेना ग्रृप खान्देश