सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे

🔺गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा व तक्रार !!

🔺ही आहे मुंबई वाहतूक पोलीस दलातील भ्रष्टाचार कार्य प्रणालीची खरी सत्यता व कार्यपद्धत

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.4नोव्हेंबर): – उद्धवजी ठाकरे जी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री महोदय व माझे मुंबई पोलीस आयुक्त श्री हेमंत नगराळे जी मी माझ्यावरील एकतर्फी अन्याय व मुंबई वाहतूक विभागातील भ्रष्टाचार करणाऱ्यांनी मला कशा अश्लील शिवीगाळ, घरात घुसून माझ्यावर कसा प्राणघातक हल्ला करून मी महाराष्ट्र राज्यातील वाहतूक विभागातील सनदी अधिकारी त्यांचे मर्जीतील विविध पदांवरील पोलीस निरीक्षक व या भ्रष्टाचार कार्य प्रणालीतील भ्रष्टाचार रण नितीकर कॅशियर पोलीस अंमलदार यांच्या बाबत नमूद व्हिडीओ च्या माध्यमातून माझ्यावरील जीव घेणे हल्ले, अश्लील शिवीगाळ याबाबत सांगितले आहे.

या गंभीर प्रकरणांत वाहतूक पोलीस दलाची बदनामी करणारे मुखींया आहेत ते या वाहतूक विभागातील वपोनी,प्रभारी पोलीस निरीक्षक व त्यांचे कॅशियर आहेत.

महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस दलाची खडणी वसुली व भ्रष्टाचार कारभार हा नव्याने सांगण्याची गरज नाही मात्र त्याचाच मनमानी कारभार करून मुंबई ताडदेव वाहतूक विभाग प्रपोनी जगदाळे व गँग ऑफ वाहतूक विभाग मुंबई यांचे हितचिंतक असलेल्या निर्लज्ज असलेल्या कॅशियर पोलीस अंमलदार यांच्या व त्यांच्या गुंड यांनी मला जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजे गल्लीतल्या बेघर भटक्या कुत्र्यांनी एखाद्या वाघाची शिकार करण्याचा प्रयत्न करणे असेच आहे अर्थात वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभारातील ही भटक्या कुत्र्या कडूनही वाघाची शिकार करणं श्यक्य नाही.

नवी मुंबई, ठाणे, मुंबई वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभाराचे खरे जनक या विभागातील आजी माजी ठराविक सनदी अधिकारी व मपोसे पदांवरील विविध अधिकारी व हप्ता खडणी वसुली चे पोलीस अंमलदार यांनी व राज्य शासन व माझ्या पोलीस दलातील चिरी मिरी करता लाचार असणाऱ्या सनदी अधिकारी व त्यांच्या भ्रष्टाचार कारभाराची शेण खाण्याच्या कार्य प्रणालीवर स्वतः अंकुश ठेवावा नंतर माझ्या नावाची सुपारी गल्लीतील कुत्र्यांना द्याव्यात आपल्या सर्वांच्या शेण खाण्याच्या भ्रष्टाचार कारभाराचे योग्य रेकॉर्डींन मी मे उच्च न्यायालयात नक्कीच पुराच्या सह सादर करीन.

महाराष्ट्र राज्यातील वाहतूक विभागातील सेन खाणाऱ्या सर्वाना या माध्यमातून मी विनंती करतो की तुमच्या भ्रष्टाचार कारभाराचे शेण खाऊ वृत्तील आळा उपाय योजना आजी माजी सरकार, व माझ्या पोलीस दलातील सनदी अधिकारी व त्यांच्या भ्रष्टाचार कारभाराचे जण न कोण असतील तर त्या त्या काळातील हे गजकर्ण लोक प्रतिनिधी ? शासकीय सेवक व निर्लज्य करून ठेवलेली व्यवस्था आहेच. जय हिंद !! सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल. या गंभीर प्रकरणांत ज्यांना ज्यांना माझ्यावरील एकतर्फी अन्याय व जीवे मारण्याच्या धमकीचे सर्व इत्यभूत योग्य कायदेशीर कारवाई पुरावे माझ्या कडे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र, मुंबई
©️ALL RIGHT RESERVED