वीटभट्टी कामगारांच्या चिमुकल्यांसोबत केली दीपावली साजरी

30

🔸पत्रकार विश्वास मोहिते यांचे सर्व स्तरातून कौतुक

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सतारा(दि.4नोव्हेंबर):-सगळीकडे फटाक्याची धामधूम आणि रोषणाईची आतषबाजी सुरु आहे अशावेळी काही लोक सामाजिक बांधिलकी ही विसरतात, परंतु तिरंगा रक्षकचे संपादक आणि आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी सामाजिक बांधिलकी जपत कराड तालुक्‍यातील काही गावातील वीटभट्टीवर जाऊन कामगारांच्या चिमुकल्या मुलांच्या सोबत दीपावलीच्या गोड पदार्थांचा आस्वाद घेत आनंदीमय दीपावली साजरी केली.या नावीन्यपूर्ण दीपावलीचीच चर्चा सातारा जिल्ह्यात सुरु आहे.

विश्वास मोहिते गेली दहा वर्षे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि तिरंगा रक्षक साप्ताहिकाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत.दीनदुबळ्या लोकांना मदत करणे, दलित पददलित, वंचित आणि निराधार अशा लोकांना संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचे निमित्ताने विविध उपक्रम राबवत आहेत. सध्या सुरू असणाऱ्या दीपावलीच्या धामधुमीत सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे हे ओळखून उपक्रम राबविण्याचे ठरविले.

यावेळी अवनी संस्थेच्या सातारा जिल्हा समन्वयक राधिका लोखंडे यांच्या सूचनेप्रमाणे विटभट्टीवर चिमुकल्यांना दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट देण्याच्या विनंतीला मान देऊन वारुंजी येथील वीट भट्टी कामगारांच्या चिमुकल्या सोबत दिपावली साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आपल्या पदाधिकाऱ्यांसह विविध वीटभट्टी परिसरात जाऊन चिमुकल्यांन सोबत गोड फळांचा आस्वाद घेत दीपावली साजरी केली. यावेळी आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे पदाधिकारी संतोष भिंगारदेवे, वारुंजी गावचे युवा नेते सिद्धेश्वर पाटील,कार्वेचे विजय वायदंडे, कालवडेचे हिंदुराव साठे, अवनी संस्थेच्या राधिका लोखंडे उपस्थित होत्या.
अशा सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या उपक्रमांमुळे विश्वास मोहिते यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.