आय.टी.आय. प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ७ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार

26

✒️रोशन मदनकर(उप संपाद)

गडचिरोली(दि.4नोव्हेंबर):-राज्यातील शासकीय किंवा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्यांची संधी हुकलेली आहे अशा इच्छूक उमेदवारांना रिक्त जागेवर प्रवेशासाठी नव्याने आॕनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी प्रशिक्षण महासंचालनालयांनी करून दिलेली आहे. अश्या उमेदवारांनी दि.७ नोव्हेंबर पर्यंत itiadmissions@dvet.gov.in किंवा www.dvet.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा . अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांची गुणवत्ता यादी दि. ८ नोव्हेंबर ला संबंधित संस्थेत लावण्यात येईल. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरी सुरू होईल.

संकेतस्थळावर सूचित केलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.शिल्प कारागीर योजना,आदिवासी उपाययोजना ,अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिकरण योजना ,अनुसूचीत जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर १८ नोव्हेंबर पर्यंत सुटीचे दिवस वगळता प्रवेश घेण्यासाठी ही संधी संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे.

हे विशेष.
समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करून या प्रवेश फेरीचा इच्छूक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा. औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ अवश्य घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी औ.प्र.संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य संतोष सांळुके यांनी केलेले आहे