कल्याणेहोळ येथे बळीराजाला अभिवादन

26

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.5नोव्हेंबर):-धरणगांव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील प्रगतिशील शेतकरी अरुण गरबड पाटील यांच्या शेतात जगाचा पोशिंदा लोककल्याणकारी राजा बळीराजाच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी साहेबराव पाटील, छोटू पाटील, भागवत मराठे, किशोर चौधरी, दीपक पाटील, देवीदास पाटील, सागर पाटील, कृष्णा तेलंग, नानसिंग पावरा व शेतकरी कृती समितीचे तालुका समन्वयक गोपाल पाटील इत्यादी उपस्थित होते.