शेतकऱ्यांचा राजा महात्मा बळीराजास विनम्र अभिवादन

✒️पी.डी. पाटील(विशेष प्रतिनिधी)

धरणगांव(दि.5नोव्हेंबर):- धरणगाव येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथील उपक्रमशिल शिक्षक पी.डी.पाटील सर यांनी आपल्या गावी मांदुर्णे, ता. ४०गांव येथे आपल्या कुटुंबीयांसोबत जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी महात्मा बळीराजा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सहकुटुंब विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी धर्मराज पुंडलिक पाटील यांनी सपत्नीक महात्मा बळीराजा व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले.

पी.डी.पाटील यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला महात्मा बळीराजा यांचा जीवन संघर्ष थोडक्यात सांगितला. आपल्या शेतकरी कुटुंबाचे दैवत लोककल्याणकारी राजा जगाचा पोशिंदा महात्मा बळीराजा हेच होय. जीवनात या थोर महापुरुषांचे विचारच आपल्याला तारतील असे प्रतिपादन केले.याप्रसंगी वडील धर्माराज पुंडलिक पाटील, आई सुंदरबाई धर्मराज पाटील, पत्नी वेणु पाटील, लहान बहीण पद्मिनी माळी, लहान बंधू निलेश पाटील [ प्रा.शि.] , पुष्पा पाटील, प्रा.पंकज पाटील व परिवारातील सर्व लहान बाल – गोपाल मंडळी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED