राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आचार्य ना.गो. थुटे यांची निवड

30

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.5नोव्हेंबर):-मराठी बोली साहित्य संघ नागपूर चे आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन येत्या दि. १२ डिसेंबर २०२१ (रविवारी )रोजी दानापूर ता. तेल्हारा जि. अकोला येथे आयोजित करण्यात आलेले आहे. दानापूर येथे आयोजित सभेत मराठी बोली साहित्य संघाचे वतीने संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर ,कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतिमाताई इंगोले , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , डाॕ. संजय निंबेकर तसेच स्थानिक आयोजन समिती सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वानुमते संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य ना.गो. थुटे (वरोरा )यांची निवड करण्यात आलेली आहे.

तारीख ,स्थळ निरीक्षण ,निवास व्यवस्था आदी बाबत सविस्तर चर्चा होऊन सदर संमेलन दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत करण्याचे निश्चित झाले.तसेच दि. ११ डिसेंबर च्या सांयकाळी ७ ते १० पर्यंत गावक-यांच्या आग्रहास्तव लोककला(दंडार, गंमत,डहाकाआदी) सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे.

दानापूर या गावी जाण्यासाठी अमरावती पर्यंत रेल्वेने जावे लागते तेथून अमरावती – आकोट हिवरखेड मार्गे किंवा शेगाववरूनही संमेलन स्थळी जाता येते . सदर संमेलन स्व. बापुसाहेब ढाकरे कला अकादमी आणि कै.शामरावबापू सार्वजनिक वाचनालय दानापूर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामवासिय जनतेच्या सहयोगाने होत आहे.संमेलनाचे आयोजन हे छोटेखानी असून कोरोना नियमांचे अधिन राहुन करण्यात येणार आहे.राज्यातील बोली अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहे .