उप नगराध्यक्ष नबू पिंजारींंनी गरीब नवाज वेलफेअर संस्थेतर्फे आकराशे महिलांना भाऊबीज निमित्त साड्या वाटप व तीन क्विंटल मिठाईचे वाटप

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.6नोव्हेंबर):- येथील नगरपरिषदेचे उप नगराध्यक्ष तथा गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष नबू बशीर पिंजारी यांनी भाऊबीज चे अवचित साधत दीनदुबळ्यांसह कष्टकरी अकराशे महिलांना साड्या वाटप करत तीन क्विंटल मिठाई वाटप केले. कोविड काळात परिस्थितीत देखील गरजूंना मदतीचा हात संस्थेच्या माध्यमातून दिला होता.

नेहमी समाजाचे काही देणे लागते या उदात्त हेतूने उप नगराध्यक्ष तथा गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष नबू बशीर पिंजारी माध्यमातून दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा, म्हणून भाऊबीज निमित्ताने गोसीया नगर, गोपालपुरा, तिरमली वाडा, वरवाडे भाग, पाच कंदील आदी भागात अकराशे साड्या व तीन क्विंटल मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी अजीबहजी पिंजारी, अकबर पिंजारी, राजू खाटीक, इस्माईल पिंजारी, सलाम शहा, रफिक शेख, काबीज पिंजारी, शिवा नगराळे आदी उपस्थित होते.