उमरखेड येथे एक पणती शहीदासाठी उपक्रम

30

🔸नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)मो:-8806583158

उमरखेड(दि.6नोव्हेंबर):/ज्यांच्या प्राणाच्या अहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड तर्फे शहीद स्मारक येथे एक पणती शहीदांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभूतपूर्व साहस, देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती ,धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यावर मात करून आपल्या जीवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबाबापर्यंत लढणारे भारतीय शहीद वीर जवान यांना पणती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
दिवाळी उत्सव आपण घराघरात दिवे लावून हर्षोउल्हासात साजरा करतो.

सर्व सामान्य माणसांपासून गरीब-श्रीमंत आपापल्या परीने हा सण साजरा करतात परंतु आपल्या देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांनी त्यांच्या प्राणाची आहुती, बलिदान देऊन त्यांच्या घरची पणती विझवुन देशासाठी सर्वस्व अर्पण केल्यामुळेच आपण दिवाळीच नव्हे तर सर्व सण उत्सव आनंदात साजरे करू शकतो .आपल्या आनंदात देशाच्या सीमेवरील शहीद झालेल्या लाखो जवानांच्या परिवाराचे दुःख आहे, ही भावना लक्षात घेऊन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानता विकास संस्था उमरखेड च्या वतीने दरवर्षी एक पणती शहरासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.

यावेळी एपीआय संदीप गाडे, न. प. सदस्य गजेंद्र ठाकरे ,माजी सैनिक अविनाश विणकरे ,मनोहरराव धामणकर ,माधवराव खंडाळे, माणिकराव वाकडे, वीरूभाऊ खंदारे, सचिन हटकर, तसेच अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानव विकास संस्थेचे दीपक ठाकरे, प्रभाकर दिघेवार ,गजानन रासकर ,गजानन वानखेडे, प्रा.अनिल काळबांडे, रामकिसन शिंदे कृषी पर्यवेक्षक, देविदास कानडे, विजय नगरकर, काशिनाथ कुबडे इत्यादींनी पुढाकार घेतला.