बळीराजा महोत्सवा निमित्त चंद्रपूरात वामन दहन संपन्न

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6नोव्हेंबर):-मागील 10 वर्षाची बळीराजा महोत्सवाची परंपरा जोपासत सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने चंद्रपुरातील दाताला रोडवरील जिजाऊ लॉन च्या समोरील मैदानावर बळीराजा पूजन व प्रजावत्सल आणि दानशूर बळीराजाला कपटाने मारणाऱ्या विदेशी आर्य दगाबाज बटू वामनाचे दहन करून बळीराजा महोत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज उर्फ परशुराम धोटे, कबीर पंथी संत मा विज्ञान महाराज, सत्यशोधक समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक हिराचंद बोरकुटे, mel एम्प्लॉईज संघटनेचे सचिव व इंटक नेते चंद्रशेखर पोडे, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन चे राज्य अध्यक्ष मा राजकुमार जवादे, ओबीसी जनगणना समितीचे भास्कर सपाट, प्रा माधव गुरनुले, काँग्रेस ओबीसी सेल चे उमाकांत धांडे, अर्जुन आवारी, डॉ बाळकृष्ण भगत, राजेंद्र चांदेकर, भास्कर डांगे, प्रफुल मोगरे, पी आर मांडवकर, सेल्फ रिस्पेक्ट युथ विंग चे सौरभ होरे, कौस्तुभ बनकर, ई नी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला परिवर्तनवादी आणि मनावतावादी शेकडो कार्यकर्ते, नागरिक आणि युवक उपस्थित होते.