रब्बी पिकाच्या पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांची सुरुवात

25

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)मो:-880683158

उमरखेड(दि.6नोव्हेंबर):-उमरखेड तालुक्यात पाऊस थांबल्यानंतर आता शेतकरी रब्बी हंगामाच्या पिकाच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मुळावा आणि धनज ,वाणेगाव ,येथे नांगरणी व वखरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी हरभरा पेरण्यास सुरुवात केली.

यावर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे बरेचसे नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात आहेत. आता शेतकरी यातून सावरत हरभरा, गहू ,उन्हाळी ज्वारी ,करडई, इत्यादी पिकांची पेरणी करण्यात मग्न आहेत. मागील काही दिवसांत पाऊस झाल्याने पावसामुळे जमिनीत ओलावा असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करणे योग्य समजले आहे.

शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जमिनीत ओलावा असल्यामुळे बियाण्यांची उगवणक्षमता उतमरीत्या होते त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक ठिकाणी गहू पेरणीसाठी जमीनीची मशागत चालू आहे. उमरखेड तालुक्यातील मुळावा, वानेगाव ,तिवरंग,धनज, तरोडा या आसपासच्या परिसरात शेतकरी रब्बी पिकाच्या कामात व्यस्त आहेत.