३० नोव्हेंबर पासून बंद होणार पंतप्रधान गरीब कल्याण योजना

24

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि.6नोव्हेंबर):-गेल्यावर्षी कोरनाच्या काळापासून पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिले जात आहे. यातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार आहे .

देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना मोफत देण्यात येणारे रेशनचे वितरण फक्त ३० नोव्हेंबरपर्यंत देण्यात येईल तर ३० नोव्हेंबर पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय या योजनेअंतर्गत गरिबांना मोफत रेशन मिळणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

तर गेल्या वर्षी कोरोना च्या काळापासून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिलं जायचं मात्र आता येत्या ३० नोव्हेंबर पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.