योग करा स्वस्थ रहा!

83

आजचे जीवन हे धकाधकीचे जीवन आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराकडे दुर्लक्ष केले जात आहे.कामाच्या व्यस्तपणामुळे आपण विसरतो की निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. शरीर जर निरोगी नसेल तर आपण अनेक आजाराला बळी पडतो. आजार किंवा अशक्तपणा आपल्या निष्काळजी पणामुळे किंवा बेजबाबदार कृत्यामुळे होतात. आजच्या आधुनिक जीवन पद्धतीमुळे शरीराचे संतुलन बिघडते. परिणामतः हुंदय विकार, दमा, श्वसनाचे आजार, मधुमेह, कर्करोग, अल्सर इत्यादी अनेक आजार माणसाला उद्भभतात.
अशा दुर्बल अवस्थेत आपण डॉक्टरकडे धाव घेतो. डॉक्टर हा देव समजून आपण त्यांच्या वर विसंबून राहतो. डॉक्टर आजाराच्या अनुषंगाने महागडे औषधोपचार करतो. आपल्याला आराम होतो. अशा वेळेस औषधे घेऊन अप्रत्यक्षपणे आपला आजार वाढवित असतो. अशा वेळेस औषधीचे प्रमाण कमी करून जर आपण योगाचा आधार घेतला तर आपल्याला फायदा होऊ शकतो.

शक्ती व बुद्धी हे जीवनाच्या गाडीची दोन चाके आहेत. ज्या प्रमाणे बालपणापासून ही गाडी शंभर वर्षे बिना अपघात चालू शकते. आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी आसन, प्राणायाम,ध्यान इत्यादी ची माहिती प्राचीन ग्रंथात दिलेली आहे.निरोगी शरीर, कुशाग्र बुद्धी आणि एकाग्र मन यांना विकसित करण्याचे काम योग साधनाने शक्य होते.म्हणून पूर्वीचे लोक म्हणत होते की लहान मुला पासून ते वयोवृद्ध पर्यन्त सर्वजण पैसे खर्च न करता पूर्ण आरोग्य योग साधनेने प्राप्त करू शकतात.बहुतांशी लोक वेळेअभावी योग करणे टाळून महागडे औषधाकडे वळतात.योग ही अशी किमया आहे की मोठमोठे असाध्य रोग बरे होऊ शकतात. म्हणुन मी म्हणतो योग करा नेहमी साठी स्वस्थ रहा.

✒️श्री.विठ्ठल किसन गोंडे(विषय शिक्षक)जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा, पं.स. गोंडपीपरी जि चंद्रपूर