एस टी कर्मचारी यांचा उमरखेड येथील बेमुदत संप

25

🔹भिम टायगर सेना व रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो.9823995466)

उमरखेड(दि.6 नोव्हेंबर):-उमरखेड येथे एस.टी.कर्मचारी यांचे दि. तीन नोव्हेंबर पासून आमरण उपोषण व संप सुरू आहे.एस.टी कर्मचारी यांच्या सर्वच मागण्या रास्त असून त्यांच्या संपाला भिम टायगर सेना, व रिपब्लिकन सेनेच्या वतीने, जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

एसटी कर्मचारी यांची प्रमुख व मागणी आहे की एसटी महामंडळ यांचे राज्य शासनात विलीनीकरण करा या प्रमुख मागणीला धरून उमरखेड येथे एस. टी. आगरासमोर सुरू असलेले उपोषण व संप अधिकच जोर धरत आहे. या एसटी कर्मचारी यांच्या संपाला समाजातील विविध थरातून पाठींबा देण्यात येत आहे. त्या पैकीच आज भीम टायगर सेना, व रिपब्लिकन सेना उमरखेड यांनी जाहीर पाठिंबा देऊन संपकरी यांच्या मध्ये उत्साह व ऊर्जा निर्माण केली आहे. भविष्यात ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडल्या शिवाय शांत बसणार नाही..!

असा इशारा राज्य शासनाला देण्यात आला आहे. यासाठी आमचे संपूर्ण कार्यकर्ते एसटी कर्मचारी यांच्या सोबत आहोत असा विश्‍वास संपकरी व उपोषण करते यांना दिला आहे.
लवकरात लवकर एस.टी कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण करा.असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष, सिद्धार्थ दिवेकर, रिपब्लिकन सेना, तालुकाध्यक्ष, देवानंद पाईकराव, कुमार केंद्रेकर, कैलास कदम, तालुकाध्यक्ष, राहुल तपासे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.