गोमांस विक्री करतांना आरोपी जेरबंद..२१७ किलो गोमांस जप्त

🔹जिल्ह्यातील पुन्हा काही ठिकाणी गोमांस विक्री होत असल्याची चर्चा

🔸गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन शोध घेणार का

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.७ऑक्टोंबर):-आज सकाळी एका विश्वसनीय आणि गोपनीय माहिती देणाऱ्या खबऱ्यां कडून राम नगर येथे जीलानी बाबा दर्ग्याच्या मागे एका घरात गोमांस विक्री होत असल्याची माहिती शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष यांना मिळाली होती.प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सहकार्याने नियोजनबध्द सापळा रचून, गडचिरोली पोलिसांच्या मदतीने रामनगर परिसरातून एका व्यक्तीला गोमांस विक्री करतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीच्या घरातून टेबलावर आणि फ्रीज मध्ये ठेवलेला एकूण २ क्विंटल १७ किलो गोमांस जप्त करण्यात आला असून, त्यांचेवर गोवंश संवर्धन कायद्या नुसार कारवाई करण्यात आली आहे.

मागील अनेक दिवसापासून गडचिरोली शहरातून चंद्रपूर मार्गाने गाई बैलांची अवैध मार्गाने वाहतूक राजरोसपणे चालू असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले होते. ऑक्टोंबर महिन्यात पोलिस स्टेशन समोर एका आयशर कंपनी च्या मेटाडोर वाहनातून अवैध मार्गाने गाई बैलांची वाहतूक करतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.इंदिरा गांधी चौकापासून चंद्रपूर कडे जाणाऱ्या महामार्गावर एका बोलेरो वाहनाचा पिच्छा करतांना दोन गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटनाही दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी रात्रीला घडली होती. त्यावेळेस पोलीसांनी योग्य कारवाई केली नसल्याचे चर्चिले जात होते.

आज घडलेल्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपीला गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे. आज गोमांस विक्री करतांना मिळालेला आरोपी हा,मागच्या महिन्यात गोतस्करांच्या हल्यात गंभीर जख्मी झालेल्या गो – रक्षकांना पाहायला , काळजी वाहक असल्याप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात गेला होता हे विशेष….गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत कुठेही अवैध मार्गाने गाई बैलांची तस्करी,गोमांस विक्री करतांना दिसून आल्यास त्या लोकांची गोपनीय माहिती पोलिस ठाण्यात ०७१३२/२९५३३४ या टेलिफोन नंबर देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी केले आहे.

Breaking News, गडचिरोली, महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED