रा.प.म कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलीनीकरण करा

28

🔸गडचिरोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची माजी आमदार डॉ उसेंडी यांचे कडे मागणी

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.7नोव्हेंबर):-अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचारी अगदी तटपुंज्या पगारावर निस्वार्थपणे रात्रंदिवस प्रवाश्यांना सेवा देत आहेत. मात्र मागील काही वर्षापासून प्रशासनाने त्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे दोन करार प्रशासनाने हाती घेतले नाही. त्यामुळे कर्मचारी फार मोठया आर्थिक विव्हनचनेत सापडला आहे. आर्थिक परिस्थितीला व कर्जाला कंटाळून आजपर्यंत ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या सारखे प्रकार घडवले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून त्यांच्या इतर मागण्या मान्य कराव्या अशी मागणी गडचिरोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात पुढे म्हंटले की, एसटी महामंडळात १८ संघटना असल्या तरी त्या संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करून प्रशासनाने शासनासोबत हात मिळवणी करून एसटी कर्मचार्यांच्या विलनिकर्णाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक समस्याची सोडवणूक ही केवळ राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण झाले तरच शक्य आहे. या मतावर एसटी कर्मचारी ठाम असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. २७ – आक्टोम्बर ला राज्य व्यापी कृती समितीने आंदोलन सुरू केले होते. परिवहन मंत्र्याने आंदोलनाच्या शिष्टमंडळाला पाचारण करून कृती समितीला कर्तव्य भत्ता , महागाई भत्ता, इत्यादी मागण्या मंजूर केल्यामुळे २८ – ऑक्टोबरला आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र दिवाळी अग्रीम रक्कम १५ हजार बोनस , राज्य शासनात विलीनीकरण , यासारख्या मागण्या शासनाने मान्य केले नसल्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात कुटुंबासाहित सहभागी झाले असून आंदोलन स्थळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तरी मोहदयानी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी वाहनचालक समाधान मार्कंडे ,सुनील पेचकोळ, अंकुश केंद्रे, राजीव जुमडे, महेश जंजाळकर, महेश बहिरेवार, मनेराम कुळयेटी, संतोष चलाख, नारायण फड, राजरत्न पेटकर, मोतीमाला सहारे, भास्कर आत्राम, व आदी कर्मचाऱ्यांनी माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी याना दिलेल्या निवेदनातून केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. अशे आश्वासन देऊन उपोषण मंडपास भेट दिली. व सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई वाटुन त्यांच्या लढ्यास शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा समन्वयक हसनअली गिलानी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शिक्षक सेल अध्यक्ष डी डी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार स्वयंरोजगार अध्यक्ष काशीनाथ भडके, लहुकुमार रामटेके, रामदास टिपले, हेमंत भांडेकर, पंकज खोबे , योगिता सातपुते आदी बहुसंख्य काँग्रेसचे शिष्टमंडळ व एसटी कर्मचारी उपस्थित होते.