धनज यथे बिरसा क्रांती दलाची बैठक संपन्न

26

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(ता.7नोव्हेंबर):- धनज येथे नुकतीच प्रज्ञासूर्य अभ्यासिका वर्ग येथे बिरसा क्रांती दलाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीमध्ये बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी. अंबुरे यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले .ते म्हणाले शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. शिक्षणाशिवाय आपल्या समाजाला तरणोपाय नाही. शिक्षण म्हणजे केवळ वाचता लिहिता येणे नव्हे, तर शिक्षण म्हणजे विवेका नुसार विचार करणे होय. वैज्ञानिक विचारसरणी, विज्ञानाचा वापर हित व अहित यातील फरक शिक्षणामुळे आपल्याला कळते.

शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास मनुष्याचा शिक्षणामुळे बौद्धिक, मानसिक क्रियात्मक विकास होण्यास मदत होते. समाजामध्ये व्यक्तीचे वर्तन सुसंस्कृत व्हावेत आपले विचार व भावना अधिक चांगल्या शब्दात व्यक्त करता याव्या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन अधिक समृद्ध व्हावे यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते म्हणून आदिवासी समाजातील युवकांने शिक्षणाची कास धरावी असे प्रतिपादन डि.बी.अंबुरे यांनी केले.पुर्वी काही जातिच्या अंतर्गत उपजिविका करत होते ,माळी, कोळी, कुंभार, धोबी, सगळ्या प्रकारचे लोक त्यांना त्यांच्या पुढच्या पीढीला तेच काम कराव लागत होत ते वंश परंपरागत कराव लागत होत.

पण आज संविधानामुळे शिक्षणामुळे ते आधिकारी होतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या व्यवसायाच स्वातंत्र्य मिळाले आहे. आज कुढलाही तरुण ,सामान्य माणूस थेट पंतप्रधानापासुन राष्ट्रपती पर्यंत कुणावरही भाष्य करु शकतो ही ताकद ,हा आत्मविश्वास शिक्षणातुन भारतीय संविधानातुन आला आसे प्रतिपादन अमोल जोगदंडे यांनी या ठिकाणी केले.

या बैठकी करिता गावातील तरुण वर्ग उपस्थित होता यामध्ये बापुराव धनवे पोलीस पाटील,संजय झाटे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाळले ,प्रदीप धनवे ,सचिन बोंबले, गणेश गायकवाड, यश झाटे, वैभव वाळके, विशाल उगले, समाधान साबळे ,बालाजी बोबंले, प्रमोद गुहाडे ,विरेन डोंगरे, तेजस डोंगरे ,प्रशांत डोगंरे ,वैभव डोगंरे,शुभम डोगंरे, विवेक वाळके, प्रतिक महाजन, अजय पठाडे,निशांत डोगंरे, कैलास बोबंले, सुनील वाळले, राहुल व्यवहारे,र्हतीक ईगंळे,श्रीकांत साबळे उपस्थित होते ,कार्यक्रमाचे आयोजन जयराम कर्हाळे बिरसामंडळ धनज यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश डोंगरे यांनी तर आभार प्रविण वाळले यांनी मानले.
अमोल उत्तम जोगदंडे/विशेष प्रतिनिधी 8806583158