दोन वर्षांच्या आराध्या हिंगवे या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी’ !

29

🔸आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने १० लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया !

🔹हिंगवे कुटुंबियांना मिळाला दिलासा !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.8नोव्हेंबर):-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर राहत असून ज्या गरिबांजवळ विविध रोगांवर उपचार करून घेण्यासाठी पैसा नाही अशा रुग्णांना मदत करत आहे.वरुड तालुक्यातील जामठी येथील दोन वर्ष वय असलेल्या कु.आराध्या बळीराम हिंगवे हिला जन्मत:च कर्ण दोष असल्यामुळे पुन्हा ऐकण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे महत्त्वपूर्ण असलेल्या ‘कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी’ दोन वर्षांच्या कु.आराध्या बळीराम हिंगवे या चिमुकलीवर ६ आक्टोबर रोजी कोकिळा बेन हॉस्पिटल मुंबई येथे १० लक्ष रुपयांची यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यापैकी ६ लक्ष रुपयांची “कॉक्लियर इम्प्लांटस”मशिन आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते कु.आराध्या हिंगवे हिला देण्यात आली. त्यामुळे कु आराध्या हिंगवे या दोन वर्षीय चिमुकलीला दिलासा मिळाला आहे. आराध्या हिंगवे या मुलीवर कॉक्लियर इम्प्लांट मोफत शस्त्रक्रिया केल्यानंतर आराध्याची प्रकृती उत्तम असून तिला व्यवस्थित ऐकूही येत आहे,‘कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी’ साठी साधारण दहा लाख रुपये मोजावे लागतात या सर्जरीचा अवाढव्य खर्च, येत असल्यामुळे पालकांची आर्थिक स्थिती नसल्यामुळे शस्त्रक्रिया करण्याकडे पालकांचे दुर्लक्ष होते.

त्यामुळे मुले कर्णबधिर राहतात. यासाठी आमदार देवेंद्र भुयार विविध रुग्णांसाठी पुढाकार घेऊन रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा देण्याचे काम करतांना दिसत आहे. जामठी येथील कु.आराध्या हिंगवे हिचे शस्त्रक्रियेकरीता आमदार देवेंद्र भुयार, संदीप खडसे, कपिल परिहार, रुग्णसेवक पंकज ठाकरे, अभिजित महल्ले यांनी सहकार्य केल्यामुळे हिंगवे कुटुंबीयांनी सर्वांचे मनापासुन आभार व्यक्त केले.