अहमदनगर जिल्हा रुग्णालयामधील अग्नितांडव

30

🔸मृतांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अंगावर काटा आणणारा अहवाल

✒️अहमदनगर प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

अहमदनगर(8दि.नोव्हेंबर):-अहमदनगर मधील शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागाला अचानक लागलेल्या आगीने महाराष्ट्रात खळबळ उडाली. अत्यंत गंभीर अन दुर्दैवी अशा घटनेने महाराष्ट्र ऐन दिवाळीत शोकसागरात बुडाला.राष्ट्रीय नेत्यांनी देखील या घटनेची नोंद घेतली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला.आज या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाले. यातून महत्वाची माहिती समोर आली आहे.

त्यावेळी 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान मृतांच्या नावाची यादी आता समोर आली आहेत. मृतांमध्ये सहा पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे. 1) रामकिशन विठ्ठल हरपुडे, 2) सिताराम दगडू जाधव, 3) सत्यभामा शिवाजी घोडेचोरे, 4) कडूबाई गंगाधर खाटीक, 5) शिवाजी सदाशिव पवार, 6) कोंडाबाई मधुकर कदम, 7) आसराबाई गोविंद नागरे, 8) शबाबी अहमद सय्यद,
9) दिपक विश्वनाथ जडगुळे अशी या मृतांची नोवे आहेत. 11 मृतांपैकी अद्याप दोन जणांची ओळख समोर येऊ शकलेली नाही. दरम्यान या आगीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आग लागल्यानंतर आग विझवणे, रुग्णांना तात्काळ सुरक्षीत ठिकाणी हलविणे,रुग्णांचे जीव वाचवणे या सर्वांबाबत हलगर्दीपणा करणे, तसंच इतर अनुषंगिक कारणांमुळे 11 जणांचे मृत्यू आणि रुग्णांच्या दुखापतीस जबाबदार असलेल्या संबंधितांविरोधात भांदवी कलम 304 (अ) नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.