दौपदीचे वस्त्रहरण, सीतेची अग्निपरीक्षा आणि भाऊ बीजेच्या निमित्ताने

29

आज आपण भाऊबीज आणि रक्षाबंधन हे सण (दोन दिवस)आमच्या बहिणींसाठी राखुन ठेवले आहेत या सणांचे सांस्कृतिक अर्थ येथे सांगणे गरजेचे नाही. ते आम्हाला माहीतच आहेत.हिंदू सण संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व बांधवाना ते अधिक कट्टरतेने सांगता येतात. असे असले तरीही मुबंई तील “हेरिटेज मासळी मार्केट” तोडणारे शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी हे सत्ताधारी आणि बीजेपी सारख्या केंद्रीय सत्तेतील भाऊ कीती निगर गट्ट आहेत हे आम्ही जाणून आहोत.आजही शिक्षण अपेक्षेप्रमाणे मंत्रालयाच्या एक किलोमीटर वरच्या कोळीवाड्यात आम्ही पोहचू दिले नाही. आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी या गावठाणात आम्ही कॉलेज काढू शकलो नाही.यासारखे सरकारी अपयश ते कोणते.शिक्षणा अभावी आमच्या महिलांना त्याचे मासळी मार्केट मधील कायदेशीर मालकीचे अधिकार माहीत नाहीत.

दौपदीचे वस्त्रहरण, सीतेची अग्निपरीक्षा आणि भाऊ बीजेच्या निमित्ताने.शिकलेल्या महिला या मासेविक्रेत्या महिलांच्या कायदेशीर अज्ञानाचा धंदा करून या मौल्यवान जागा शिवसेनेच्या बिल्डर लॉबीस फसवून, सह्या घेऊन देत आहेत.मुबई महानगर पालिकेस जमीन मालकी ठरविण्याचा कोणताही अधिकार नसताना, पोलीस सुरक्षा घेऊन मार्केट तोडत आहेत.आपल्या बहिणींची ही केविलवाणी अवस्था पाहून कोणत्याही भावाच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत. दौपदीचे वस्त्रहरण, सीतेची अग्निपरीक्षा आणि भाऊ बीजेच्या निमित्ताने….थेट भाऊबीजेच्या बहिणीच्या ओवाळणी व्यतिरिक्त त्याला काही देणे घेणे नाही.

देशातील महिलांचे वाढते विनयभंग,बलात्कार,स्त्री धन लुबाडण्याचे प्रकार पाहता.घरगुती हिंसाचार पाहता भाऊबीज- रक्षाबंधन हे सण केवळ कर्मकांडी क्रिया राहिल्या नाहीत ना? अशी चिकित्सा करावी वाटते. कायद्यातील तरतुदीमुळे अलीकडे पित्याच्या आणि पतीच्या संपत्तीच्या अधिकारापोटी स्त्रियांना अधिकार मिळू लागलेत.अर्थात हे अधिकार नाकारण्याची प्रत्यक संधी पुरुषसत्ताक मानसिकतेचे भाऊ,पिते,प्रशासन,राज्यकर्ते ,पोलीस,आणि काही प्रमाणात वकील मंडळी करत असल्याचे दिसते.हजारो वर्षांच्या जुन्या मनुस्मृती प्रधान समाजव्यवस्थेच्या स्त्रियांना पूजेत देवी बनविले, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात सर्वच मानवी अधिकार नाकारले. उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा (क्षत्रिय) वैश्य या जमीनदार सरंजामी सत्ताधारी जातींनी लग्नात हुंडा देत असताना स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अक्षरशः विकायला काढले. नवऱ्याला बैलाच्या भावाने खरेदी केले.या पवित्र कार्यात मुलींचा होणारा अपमान अगदी “हुंडा बळी” या प्रकारात नोंदला गेला.लग्नात हुंडा द्यावा लागतो म्हणून गर्भ चिकित्सा करून मुलगा आहे की मुलगी ?..हे ठरवून मुलीला गर्भातच मारण्याचे प्रकार आमदार खासदार वकील प्राध्यापक सरदार संस्थानिक यांच्या खानदान उच्च कुळातून गरिबांकडेही अनुकरणीय झाले.

नव्या विज्ञान ,वैद्यक शास्त्राचा उपयोग स्त्रीभृण हत्येसाठी होऊ लागला. गांधी हत्त्येची जेवढी चर्चा भारतात होते तेव्हढी या स्त्रीभ्रूण हत्येची होत नाही.अर्थात उच्च जातीय पुरुषांच्या जीविताची प्रतिष्टा भारतीय स्त्रियांच्या क्रूर हत्येस नाही.यानंतर तिच्या तुटल्या जाणाऱ्या घर संसाराची,मासळी बाजार,व्यवसाय, नोकऱ्या स्वाभिमानाचे,अस्मितेचे गुन्हे कोण नोंदवणार? या साऱ्या प्रकारात हातात काती कोयते घेऊन मुबंईच्या मासळी मार्केट मध्ये जगातल्या कोणत्याही पुरुष आक्रमकांना न घाबरता मासळी विकणारी आमची कोळीण या क्षणापर्यंत निर्भयपणे जगत होती.दौपदीचे वस्त्रहरण, सीतेची अग्निपरीक्षा होतांना मुखपणे पाहणारे भाऊ आता राहिले नाही.हाती पैसा असल्यामुळे पोटच्या मुलींना सांभाळणे जन्म देणे हे निसर्ग नियमाप्रमाणे सुरू होते.आई एकवीरेंची मातृसत्ताक परंपरा हुंडा घेऊ देत नाही किंवा देऊ देतही नाही.

मनुस्मृती विरोधातील या दिव्य संस्कारांची परंपरा आजही कोळीवाडा गावठाणात सुरू आहे.म्हणूनच सर्वाधिक मुलीचा जन्मदर असल्याचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई महानगर पालिकेस मिळाला.ठाणे रायगड मुंबई पालघर येथे हा स्त्री सन्मानाचा विचार 2000 वर्षे जुना आहे.द्रौपदीची वस्त्रे ओढणाऱ्या महाभारतीय,तर सीतेला अग्निपरीक्षा देऊ पाहणाऱ्या पुरुषसत्ताक रामायणाचा हा विचार नाही.हे सारे असताना ही,भाऊबीज रक्षाबधन हे सण सिडको पुनर्वसनात बहिणी,आई यांचे साडेबारा, साडेबाविस टक्के भूखंड देताना भाऊ पती,आणि पिते हेच आडवे येत आहेत. इतर कल्याण डोबिवली ठाणे पालघर येथील जमिनीला सोन्याचा भाव आलाय.भावाने पतीने पित्याने संविधान वाचले नाही.भाऊ बीजे निमित्त आगरी कोळी भंडारी बहिणीच्या हातात अजूनही संविधान पोहचले नाही. मग ती भावाला देणार कशी? कोळी वाड्यात काही उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय महिला पर्यावरण,धर्म,घेऊन जाताहेत परंतु स्त्री अधिकार, कायदे -संविधान हे सांगण्यात त्या कंजूशी करतात.आमची तुटणारी घरे,गावठाणे,मासळी मार्केट या पाठीमागे ज्या दुष्टांचा हातभार आहे त्यापासून रक्षण करण्याचे काम आता आकाशातील देव,अल्ला,येशू यापैकी कोणताच देव करणार नाही! हे काम स्त्रिया स्वतःच करू शकतात.यात मार्गदर्शक झाला तो महान भाऊ डॉ भीमराव रामजी आंबेडकर. तेव्हा तो असता तर दौपदीचे वस्त्रहरण, सीतेची अग्निपरीक्षा होऊच दिली नसती.

भारतीय स्त्रियानां ओबीसी एससी एसटी या सर्वच शोषित पीडित भारताचे, रक्षण कर्ता “धर्म” म्हणजे भारतीय संविधान.आज भावाने बहिणीला आणि बहिणीने भावाला द्यायची सर्वोत्तम भेट म्हणजे भारतीय संविधान. भारतीय बहिणींसाठी काही महत्वाचे भारतीय संविधानातील तरतूदी, महत्वपुर्ण कायदे व योजना.

१.अनुच्छेद १४ – कायद्याने समानता व समान संरक्षण
२.अनुच्छेद १५(२) केवळ धर्म, वंश, जात, लिंग यावरुन सार्वजनिक स्थाने व जागा यांचा वापर करण्यास कुठल्याही भारतीय नागरिकाला इतर भारतीय नागरिकाशी
भेदभाव करता येणार नाही.
३.अनुच्छेद १५(३) – राज्य शासन महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते .
४.अनुच्छेद १६ – सेवा योजन, पदनियुक्‍ती, नोकरी यामध्‍ये धर्म, वंश, जात, लिंग यावरुन भेदभाव न करता येणार नाही महिला व मुलींना समान संधी
५. अनुच्छेद १७ – महिला व पुरुषांसोबत अस्लेलि अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे.
६. अनुच्छेद १९ – भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटना बनविण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या कुठल्याही क्षेत्रात मुक्तपणे संचार करण्याचे, राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. कोणताही पेशा आचरण्याचे,कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालविण्याचा हक्क असेल.
७. अनुच्छेद २१ – कायद्याच्या प्रक्रियेशिवाय व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्काचा संकोच करता येणार नाही
८. अनुच्छेद २१(क)- ६ ते १४ वर्षातील मुलांना सिक्षणाचा अधिकार
९. अनुच्छेद २३ – शोषणाविरुद्ध अधिकार. मानवाचा व्यापार अथवा वेठ बिगरीस प्रतिबंध
१०.अनुच्छेद २५ – सद्सद्विवेकबुद्धिचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार
११. अनुच्छेद २६ – धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य
१२. अनुच्छेद ३९ – स्त्री -पुरुष दोघांना समान वेतन
१३. अनुच्छेद ४२ – कामाच्या ठिकाणी न्याय्य व सुरक्षितता आणि प्रसुती सहाय्य देण्याची सोय
१४. अनुच्छेद ५१ – स्त्रियांच्या प्रतिमेला हानी पोहचविणाऱ्या प्रथा बंद करणे
१५. निवडणूक लढविण्याचा अधिकार
१६. शासन-प्रशासनात कोणतेही पद भुषविण्याचा अधिकार
१७. संपती विकत घेण्याचा, बाळगण्याचा व वडिल आणि पतिच्या संपत्तीत वाटा. हे भारतीय संविधानाने दिले.मनुस्मृती, महाभारताने दौपदीचे वस्त्रहरण,रामायणाने सीतेची अग्निपरीक्षा होऊ दिले तेव्हा संविधान असते तर हे झालेच नसते.म्हणून दौपदीचे वस्त्रहरण, सीतेची अग्निपरीक्षा आणि भाऊ बीजेच्या निमित्ताने जागरूक वाचकाला देत आहे.यावर विचार,चर्चा, संवाद करा,

✒️सुलोचना पुत्र:- राजाराम पाटील(आई एकविरा मातृत्ताक जीवन शैलीचे अभ्यासक)मो:-8286031463