भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस (विद्यार्थी दिन) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8नोव्हेंबर):-काल दिनांक 07 नोव्हेंबर 2021
रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस (विदयार्थी दिवस) भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे वैचारिक कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

समस्त बहुजन समाजाला क्रांती देणारी मशाल ज्या दिवशी प्रज्वलित झाली अश्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि राजकीय पक्षाचा इतर सर्वच विदयार्थी संघटना मात्र लॉकडाऊन झाल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांच्या मध्ये जाऊन केवळ स्वतःचा प्रचार करणाऱ्या अश्या संघटनांचा खरा चेहरा काल समाजातील विद्यार्थ्यांपुढे उघड झाला.

7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकातील असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूल मध्ये (आता प्रतापसिंह हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता.त्यामुळे महाराष्ट्र भर “विद्यार्थी दिवस”साजरा केला जातो.त्याचेच औचित्य साधून विद्यार्थी दिनानिमित्त भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम 7 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न…!या कार्यक्रमाचे उद्घाटक :- मा.प्रा.लेफ्टनंट केशव पवार सर (छत्रपती शिवाजी काॅलेज सातारा) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी समाजकार्यात उतरावे.

या कार्यक्रमाची अध्यक्षता मा.योगेश थोरात सर (प्रदेशाध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) यांनी म्हणाले राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्येचे समाधान होणार नाही हे या कार्यक्रमाचे ठिकाण डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सर्वोदय हौसिंग सोसायटी रविवार पेठ सातारा येथे मोठ्या विद्यार्थी संख्येत मा.योगेश थोरात सर (प्रदेश अध्यक्ष ,भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न…!!
कार्यक्रमाचे संयोजक मा.प्रथमेश ठोंबरे (राज्य प्रवक्ता भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्य) मा.किशोर खरात (जिल्हा उपाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) मा.कुणाल देवकुळे (तालुका अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) मा.रोहित नितनवरे (शहर अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) मंगेश लोखंडे,शुभम भंडारे,इरफान महात,समता शिर्के,मानसी नितनवरे, प्रियंका ठोंबरे, संकेत यादव,इ. मा.चेतन आवडे (जिल्हा अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा)

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED