तृतीयपंथीयांना ओळखपत्राचे वितरण

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.8नोव्हेंबर):-सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तृतीयपंथीय बांधवांना मिळणाऱ्या विविध शासनाच्या योजनांचे लाभासाठी ओळखपत्र देण्यात येते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात तृतीयपंथीय बांधवांना ओळखपत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले.