धोंडराई येथे रयत शेतकरी संघटनेचा मेळावा संपन्न

40

🔸राज्यभरातून या मेळाव्याला प्रतिसाद

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.८नोव्हेंबर):-वराई तालुक्यातील धोंडराई येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने व रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या नेतृत्वाखाली मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड, रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर हा मेळावा पार पडला जिल्हाभरातून संघटनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात असून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही .शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्यास सरकार टाळाटाळ करत असून शेतकऱ्यांच्या भावनांशी केंद्र व राज्य शासन खेळत आहे .त्यामुळे आता शेतकरी संघटना भविष्यात उग्र स्वरूपात पाऊल टाकेल असे प्रतिपादन यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी केले

याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस सुनील ठोसर यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि येणाऱ्या अडचणी बाबत ठाम लढा देऊन तत्पर तुमच्या पाठिंशी खंबीर पणे उभे राहू व विविध योजनांची व पुढील काळात येणाऱ्या प्रत्येकी निवडणूकीत आपला उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, तरी आपण आतापासूनच सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी व सामान्य लोकांच्या अडचणीच्या काळात मदत होईल व तसेच शेवटच्या माणसापर्यंत पोहचत या मेळाव्यात शिबीराचे आयोजित करण्यात आले होते,

आम्ही गोरगरिबांची पोर आमचा काळ खडतर असतांना आमच्या आयुष्यात अनेक आंदोलन करून मोठं व्हायचं हा उद्देश आमचा कधीही नव्हता, आमच्या शेतकरी माय-बापाच्या न्याय हक्कासाठी आम्ही संपूर्ण आयुष्य झिजवत आहोत, याच जिल्ह्यातील मातीने शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी करण्याचं सामर्थ मित्र परिवाराने मला खांद्याला खांदा लावून दिलेली जोड प्रामुख्याने राज्यातून संघटनेच्या पायाभरणी पासून सोबत असून ते रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटत असतांना आपण बघतच आहात खरचं शेतकरी चळवळीमध्ये त्यांचं योगदान कौतुकास्पद आहे.