येणाऱ्या जि.प,पं.स.व नगरपालिका निवडणुकामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सन्मानपूर्वक हिस्सा द्या- रामदादा किरवले

51

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

माजलगांव(दि.9नोव्हेंबर):-पिपल्स रिपब्लिकन पार्टीची माजलगाव शहरची बैठक ता.अध्यक्ष राकेश साळवे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष रामदादा किरवले यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली.सदरिल बैठकित येणाऱ्या जि.प.,पं.स.व. नगरपालिका निवडणुकामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सन्मानपूर्वक हिस्सा द्या कारण या महाविकास आघाडीमध्ये पि. आर. पी. महत्वाचा मित्र पक्ष आहे.त्यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक हिस्सा देणे गरजेचे आहे.तसेच जि.प.व पंचायत समिती निवडणुकामध्ये पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश येईल व जिल्हा कार्यकारीणी जो निर्णय घेतील तेच ठरविले जाणार अाहे.

ग्रामीण भागातिल कार्यकर्ता हा पक्षाचा महत्वाचा भाग आहे म्हणुन त्याला योग्य न्याय मिळाला पाहीजे,अशी सर्व पदाधिकारी यांनी या बैठकीत एकमताने ठरवले आहे.त्यांचे राजकिय नेतृत्वगुण विकसीत होणे गरजेचे आहे.म्हणुन पि.आर.पी.ला येणाऱ्या निवडणुकामध्ये राजकिय हिस्सा द्या नसता येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार असा सज्जड इशारा पि.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष रामदादा किरवले यांनी या बैठकीत दिला.

यावेळी प्रमुख उपस्थित पि. आर. पी.चे विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ ससाणे हे होते तर चंद्रकांत टाकणखार, सुदामतात्या साळवे, अमित खर्डे, वसीम इनामदार, राहुल कांबळे,शेख राजू भाई पात्रूडवाले,नारायण शिंदे,अन्वर भाई मालकपुरे, दादाराव तोडके, बापूसाहेब येटाळे,शेख अन्नूभाई, बाळासाहेब किरवले,व्यंकट तात्या काळे, दिलीप भिसे, हनुमान भिसे,सुनील भिसे, अशोक सुरवसे,कडाजी अंबुरे, मछिंद्र ससाणे,महादेव मोरे, सुरेश साळवे,राजू शेख,शेख मजेद, भागवत शिंदे,प्रसाद अवचार,शेख नाम्मा, शुभम सुरवसे,अक्षय साळवे, अविष्कार भिसे,रोहित साळवे, आनंद जावळे,तेजस शिंदे, शुभम गायकवाड,त्रिशरण साळवे,शेख सलीम उर्फ बटर भाई,नैनीत साळवे,गोटू लांडगे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.