शेख ऐनोद्दीन सय्यद हसन “आदर्श मुख्याध्यापक” पुरस्काराने सन्मानित

24

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.9नोव्हेंबर):- येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू नं. ०१ शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक शेख ऐनोद्दीन सय्यद हसन यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगांव येथील हजरत बिलाल बहुउद्देशीय सोसायटीच्या वतीने स्वर्गवासी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांच्या स्मरणार्थ व सिरतुन्नबी निमित्त आयोजित कार्यक्रमात भुसावळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा कार्यक्रम अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षीय स्थान अंजुमन तालीमुल मुस्लिमीनचे चेअरमन एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांनी भूषविले.

यावेळी डाॅ. अब्दुल करीम सालार, भुसावल नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मुन्ना इब्राहिम तेली, नगरसेवक इब्राहीम मुसा पटेल आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अल्हाज शेख मोहम्मद अलाऊद्दीन (माजी मुख्याध्यापक), अब्दुल मजीद जकेरिया, पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद जळगांव खलील शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव यांनी मानले. आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याने मित्र परिवारातर्फे व शहर वासीयांतर्फे शेख ऐनोद्दीन सरांचे अभिनंदन होत आहे.