एस.टी. कर्मचारी संपाला बसपा माण तालुका याचा जाहीर पाठींबा;तहसीलदार यांना दिले निवेदन

✒️सचिन सरतापे प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.9नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्यात चालू असलेल्या एस.टी. कामगार संपाला माण तालुका बहुजन समाज पार्टी यांचेकडून जाहीर पाठींबा असल्याचे व कर्मचाऱ्या वर होत असलेल्या अन्याया संदर्भात आज तहसीलदार माण यांना निवेदन देणेत आले.एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जो अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे या अन्यायाच्या विरोधात एस.टी. कर्मचारी माण तालुका यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला बहुजन समाज पार्टी माण तालुक्याच्या वतीने जाहीर पाठींबा देणेत आला.

एस.टी. कर्मचारी यांच्या मागण्या महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून या मागण्या मान्य न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनातून देणेत आला.तहसीलदार यांना देणेत आलेल्या निवेदनात म्हटले आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांनी आपल्या मार्फत राज्याचे मा.राज्यपाल कोशारी,राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि परिवहन मंत्री माँ.अनिल अरब याच्यापर्यत पोहवावे.हे निवेदन देताना माण व खटाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED