होळकर साहित्याच्या अभ्यास गटाकडून गंगाखेडात घाटाची पाहणी

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.9नोव्हेंबर):-राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी गंगाखेड येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या घाटाची विदर्भातील होळकर साहित्याचा अभ्यास गटाकडून मंगळवारी पाहणी करण्यात आली.होळकर साहित्य अभ्यास गटाचे प्रमुख अशोक पातोड यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास गटाने बुधवारी गंगाखेड येथील प्रसिद्ध अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकर घाटाची पाहणी केली.राजमातेने बांधलेल्या होळकर घाटाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी या गटातील प्रा सतीश अघडते, नितीन घाडगे, घटोळ सर उपस्थित होते. या अभ्यास गटाने घाट पाहणीनंतर संत जनाबाई चे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात धनगर समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मीसे पाटील, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते ह भ प शिवाजी महाराज बोबडे आदींची उपस्थिती होती.