भाजपा भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष पदी शरद पवार यांची निवड…

104

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

माजलगाव(दि.10नोव्हेंबर):-माजलगाव तालुका भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी कार्यकारी जाहीर करण्यात आली.भाजपा राष्टीय सचिव पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.प्रीतमताई मुंडे यांचा सूचनेवरून पक्षाचे युवा नेते मा. शरद पवार यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी माजलगाव तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ लक्ष्मण जाधव भाजपा जेष्ठ नेते सर्जेराव तात्या तांदळे, देविदास भाऊ नागरगोजे भटके विमुक्त जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ पवार भाजप नेते संजय पवार ,रामेश्वर पवार इतर उपस्थित होते.