पहुरजीरा येथील उर्दू शाळेतील शेतकऱ्यांची मुले पुस्तका पासून वंचित-शोएब शेख गणेश सलात्कार आयसिंग शेख

27

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.10नोव्हेंबर):-पहुरजीरा येथील जानकी नगर येथे असलेली उर्दू शाळा ही बरेच दिवसा पासून पुस्तकामुळे वंचित असून विद्यार्थ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे.सर्व विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असून शासनाच्या वतीने पहिली ते आठवी पर्यंत मुलांना पुस्तके वाटप करण्यात येत असतात.

पण येथील उर्दू शाळे मध्ये पहिल्या वर्गाला या वर्षी शासनाने पुस्तके दिलेले नाही म्हणून सदर प्रकरण तत्काळ लक्ष्यात घेऊन पुस्तके वाटप करण्यात यावी अन्यथा सर्व विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसोबत आक्रोश आंदोलन करू असा इशारा पहुरजीरा येथील स्वाभिमानी चे शोएब शेख आणि दिला.