एसटी कर्मचारी आंदोलनाला रासपाचा जाहीर पाठिंबा

24

🔹प्रदेशाध्यक्ष आ.डाँ.गुट्टे बसणार उपोषणाला

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10नोव्हेंबर):-राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. एसटी पूर्णपणे थांबली असली तरीही सरकार मात्र याकडे पाहायला तयार नाही ही बाब अत्यंत गंभीर असुन एसटी कर्मचाऱ्यांच्या अंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून रासपचे प्रदेशाध्यक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दि.११ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून गंगाखेड बसस्थानकासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आसून अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना फारशी पगारवाढ नाही कोणतेही शासकीय लाभ मिळत नाहीत म्हणून या कर्मचाऱ्याने महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी २८ ऑक्टोबर पासून आंदोलन सुरू केले आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबापासून दुर राहून दिवाळी साजरी न करता कर्मचारी उपोषण व धरणेआंदोलन करताहेत. दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असताना राज्य शासन मात्र आंदोलनाकडे गांभीर्याने न पाहता कानाडोळा करीत आहे.

यापूर्वी राज्यात ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात काही नी बांगड्या भरून तर काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करून निषेध केला असला तरीही दगडाचे काळीज असलेल्या राज्य सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी ३७५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

सरकारची कारवाई अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली ११ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून गंगाखेड येथील बसस्थानकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. असे आव्हान जि.प.सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, रासपा नेते सुरेश दादा बंडगर, जिल्हाध्यक्ष ॲड.संदिप अळनुरे,विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे,राजू पटेल, सभापती मुंजाराम मुंडे,प.स. सदस्य मगर पोले, लक्ष्मण आप्पा मुंडे,नितीन बडे, शहराध्यक्ष शेख खालेद,राजेभाऊ बापू सातपुते, संभाजी दादा पोले, संभूदेव मुंडे,राजू खान,ब्रिजेश गोरे,इंतेसार सिद्दिकी, इक्बाल चाऊस, सतीश घोबाळे, प्रताप मुंडे,छोटू कांबळे,महेश शेटे, उद्धव शिंदे,वैजनाथ टोले आदींनी केले आहे