बँक अधिकाऱ्यावर कारवाई करा – शिवानंद पांचाळ यांची मागणी

72

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

नायगाव बाजार(दि. १० नोव्हेंबर):-आनंदा रोडे यांच्या मरणास कारणीभूत ठरणारे बँक अधिकारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाही करण्यात यावी व मयताच्या कुटुंबास तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शिवानंद पांचाळ नायगांवकर, व प्रदीप अशोकराव जोंधळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नवनाथ पाटील टेकाळे, शेषराव विठ्ठल रोडे दिगांबर पुंडलिक रोडे यांनी तहसीलदारासह पोलीस निरीक्षकाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, पत्नीच्या कर्जाची फाईल नायगांव येथील भारतीय स्टेस्ट बँकेच्या अधिकाऱ्यांनी मागच्या तीन वर्षापासून प्रलंबित ठेवून आनंदा रोडे यांच्या परिवाराचा छळ चालविला होता.

अनेक वेळा बँकेचे उंबरवठे झिजवल्यानंतरही अधिकाऱ्यांना पाझर फुटला नाही, चकरा मारून मारून वैतागलेल्या रोडे यांनी बँकेच्या खिडकीलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ( ता. सात ) रोजी उघडकीस आली, या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आणि वशिलेबाजी व दलालांची पुन्हा चर्चा सुरू झाली, आनंदा रोडे यांच्या आत्महत्येने शहरात हळहळ तर व्यक्त करण्यात येतच आहे पण अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या बेफिकीर वृत्तीबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करत आहेत. रोडे आत्महत्या करण्याचे कारण‌ सदरील बँक आहे.

असा आता आरोप होत आहे, आनंद‌च्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या स्टेट बँक इंडियाचे व्यवस्थापक पवार यांच्यावर तात्काळ पोलीस कारवाई करण्यात यावी आनंदा रोडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ यांचे मंजूर झालेले कर्ज त्वरित देण्यात यावे- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी केली असून त्या लेखी निवेदनावर स्वाक्षऱ्या प्रदीप अशोकराव जोंधळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते नागनाथ पाटील टेकाळे गौरी शेळगांवकर सह आदींनी केले आहेत सदरील निवेदन नायगांव चे तहसीलदार गजानन शिंदे सह पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना दिले आहे,