समूह संसर्गास कारणीभूत ठरण्याआधीच कीर्तनकार निवृत्ती इंदूरीकर महाराजाचे लसीकरण करावे — श्रीकांत गदळे

34

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.10नोव्हेंबर):- किसानपुत्र श्रीकांत गदळे गेल्या आनेक दिवसापासुन कोराना महामारी रोखण्यासाठी जनगृती करत आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमकडून कोरोना महामारी रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. देशात आज घडीला 100 कोटींच्या लसीचा टप्पा नुकताच पार पडला आहे. अशात लसीकरणाची जनजागृती करून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन करण्याऐवजी उलट त्यांचे व जनतेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर हे करत आहेत.

मी लस घेणार नाही असं बेताल वक्तव्य त्यांनी जाहीर कीर्तनात केली आहे. त्यामुळे इंदोरीकर यांच्याकडून समूह संसर्ग होण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे लस घेईपर्यंत त्यांच्या किर्तनावर बंदी आणावी. असी मागणी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री, यांच्याकडे किसानपुत्र श्रीकांत विष्णु गदळे यांनी निवेदनाव्दारे केले आहे.

चौकट
कोरोना चे दोन्ही डोसचे प्रमाणपत्र दाखवल्या शिवाय किर्तन करु नये जोपर्यंत हभप इंदुरीकर महाराज लस घेत नाहीत तोपर्यंत त्यांच्या किर्तनावर माहाराष्ट्रत बंदी आणावी अशी मागणी या वेळी करण्यात येत आहे.