एस. टी. महामंडळाचे 542 कर्मचारी निलंबित

30

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913314

गेवराई(दि.11नोव्हेंबर):-राज्यात सुरू असलेल्या एस. टी. कर्मचार्‍यांच्या संपाबाबत आज बुधवारी एस. टी. कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. राज्य सरकारने कठोर भूमिका घेत आज एस. टी. महामंडळाच्या 542 कर्मचार्‍यांना निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची एकूण सं’या 918 झाली आहे.

एस. टी. कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतरही संप चिघळत आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळ आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. निलंबनानंतर आता एस. टी. च्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाईल, अशी शक्यता आहे.

नागपूर विभागाच्या काटोल, रामटेक, इमामवाडा, गणेशपेठ, घाटरोड आगारातील 46, वर्धा विभागाच्या तळेगाव आगारातील 10, भंडारा विभागाच्या पवनी, साकोली, भंडारा आगारातील 30, चंद्रपूर विभागाच्या चिमुर, वरोरा आगारातील 15, अकोला विभागाच्या रिसोड, मंगळुरपीर आगारातील 20, बुलढाणा विभागाच्या चिखली, मेहकर, खामगाव आगारातील 34, यवतमाळ विभागाच्या नेर, वणी, उमरखेड, पुसद आगारातील 46, अमरावती विभागाच्या परतवाडा, चांदुररेल्वे, बडनेरा आगारातील 20, औरंगाबाद विभागाच्या औरंगाबाद-1, पैठण आगारातील 10, बीड विभागाच्या बीड, पाटोदा, धारूर, गेवराई आगारातील 22, उस्मानाबादच्या भूम, तुळजापूर, कळंब, परांडा, उस्मानाबाद, उमरगा आगारातील 36, परभणीच्या वसमत, जिंतूर, कळमनुरी, परभणी, गंगाखेड आगारातील 25, नाशिकच्या नांदगाव, मालेगाव, पेठ, कळवण आगारातील 40, अहमदनगरच्या जामखेड, श्रीगोंदा, नेवासा आगारातील 20, जळगावच्या जळगाव, एरंडोल, यावल आगारातील 28, पुणे विभागाच्या राजगुरुनगर, इंदापूर, नारायणगाव, बारामती आगारातील 26, सांगलीच्या इस्लामपूर, आटपाडी आगारातील 58, साताराच्या फलटण आगारातील 2, सोलापूरच्या सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट आगारातील 35, रायगडच्या कर्जत, श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड आगारातील 19 कर्मचार्‍यांचा यात समावेश असू शकतो.