बाबासाहेबांना अपेक्षित विद्यार्थी हा चिकित्सक वृत्तीचा व स्वतंत्र विचार करणारा असावा- समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

🔹बार्टी तर्फे शिवापूर बंदर येथे विद्यार्थी दिन साजरा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11नोव्हेंबर):-शिका संघटित व्हा आणि संगर्षं करा अशा क्रांतीचा सिद्धांत मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात जास्त महत्व हे शिक्षणाला दिले, त्यामुळे बाबासाहेबना विद्यार्थ्यांबद्दल खूप अपेक्षा होत्या. विद्यार्थी यांनी जास्तीजास्त ज्ञान संपादन करण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. विद्यार्थीनी बुद्धीला चालना देऊन बौध्दिक शक्तीचे संवर्धन केले पाहिजे व विवेक शक्ती प्रज्वलित करून आपल्या बुद्धिमतेत व कार्यक्षमतेत कमी पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. शिक्षणात शिलाला फार महत्व असायला हवे. विद्यार्थी हा दीर्घिद्योगी असला पाहिजे. विद्यार्थीनि आपल्या जीवनात आत्मविश्वास वाढविला पाहिजे.

कोणाचेही अंधानुकरण करू नये, दिव्य दृष्टी विद्यार्थी कडे असायला हवी, नवीन जीवन मूल्ये ओळखता आली पाहिजे, प्रज्ञा व प्रतिभा विद्यार्थीनाची उच्च विचारांची असायला हवी. बाबासाहेबाना विद्यार्थी हा चिकित्सक वृत्तीचा व स्वतंत्र विचार करणारा असावा अश्या प्रकारचे विद्यार्थी संपन्न समाज निर्माण करू शकतात असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी शिवापूर बंदर येथे आयोजित विद्यार्थी दिन कार्यक्रमात केले.

यावेळी बार्टी च्या युवा केंद्र स्पर्धा परीक्षा व बार्टी च्या विविध योजनेची तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची सुद्धा माहिती त्यानी यावेळी दिली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत शिवापूर बंदर चे उपसरपंच आदित्य वासनिक होते.प्रमुख पाहुणे म्हणून मूकनायक फौंडेशनचे प्रकाश मेश्राम, मिथुन शोगावकर , निखिल ननावरे आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृजन मेश्राम यांनि केले तर आभार विशाल यांनी मानले.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED