चंदनखेडा शेतशिवारात करटं लागून वाघाचा मृत्यू

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11नोव्हेंबर):- वरोरा तालुक्यातील महालगाव शेतशिवारात दोन दिवसआगोदर वाघ हरणाच्या शिकारीत असताना विहिरीमध्ये पडला होता. त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले होते.

ही घटना ताजी असताना काल अचानक ह्याच वाघाने भटाळा येथील शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांला गंभीर जखमी केले होते तर आज चंदनखेडा खेडा शेतशिवारात वायगाव रोडवर लागून असलेल्या रणदिवे नामक शेतकऱ्याच्या धान शेतात करन्ट लागून वाघाचा दुर्दवी मृत्यू झाला. नेमका हाच तो वाघ आहे का याचा तपास वनविभागाची चमू घेत आहे.