मेथी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ

27

🔹चिराग माळी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिंदखेडा

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.11 नोव्हेंबर):- मेथी ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराच्या पाश्वभुमीवर तालुका प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. या भ्रष्टाचारास मेथी ग्रामपंचायत संरपच रमाकांत बागले यांचे जिल्हापरिषद मधील उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत जि प धुळे) श्रीयुत तडवी व पी एस महाले मुख्य हस्तक म्हणून काम करत आहेत. तसेच भ्रष्टाचारातील मुख्य आरोपी असलेले सागर भदाणे हे आपलं प्रशासकीय वजन वापरून कागदपत्रांची हेरफार करत आहेत.

असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिराग माळी यांनी केला आहे. पंचायत समिती शिंदखेडा यांच्या कडून जावक क्रमांक ७५६/२०२१ दिनांक १/९/२००९ पासुन उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत जि. प. धुळे) यांच्या कडे पुढील कारवाईसाठी सादर केला होता . त्या अहवालात अपहार सिध्द झाले असून देखील जिल्हाप्रशासन देखील कागदपत्रात फेरफारीस मदत करत आहे. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. मेथी ग्रामपंचायत चे संरपच व श्रीयुत तडवी तथा पी एस महाले यांच्या संभाषणांचे सी डी आर पोलिस प्रशासनाकडून तपासण्यात यावेत अशी मागणी आम्ही पोलिस अधीक्षक धुळे यांना करणार आहेत. मेथी ग्रामपंचायत कारभाराचा खेळ पाहता मेथी परिसरातील जेष्ठ नेते व माजी सभापती श्रीयुत बापूसाहेब नरेंद्रजी गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

मेथी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी होऊन देखील अद्याप कारवाई होत नाही म्हणून मेथी फाट्यावर १४/११/२०२१ रोजी सर्वपक्षीय रास्तारोको करण्यात येणार आहे. तथा सर्व भ्रष्टाचाराचे पुराव्यानिशी धुळे येथे पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे व तालुका पंचायत प्रशासनाचे पितळ उघडं पाडून दूध का दूध और पाणी का पाणी करण्यात येईल असा सज्जड इशारा चिराग माळी यांनी दिला आहे. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर देखील खोटे कागदपत्र जोडून भ्रष्टाचार दाबण्यासाठी तालुका प्रशासन अधिकचा वेळ रमाकांत बागले यांना देत आहे.